पेन्शन मिळवून देतो,फसवणूक प्रकरणी एकास अटक
पेन्शन मिळवून देतो असे सांगून पंचवीस हजार नऊशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या अनिल गुंडू केंगार वय 70 रा. बिरदेव मंदिर परिसर,गड मुडशिंगी याला आज जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.याबाबत श्रीमती शालाबाई मारुती साळुंखे पाटील यांनी फिर्याद दिली होती.श्रीमती साळुंखे या बिंदू चौक येथील एका बँकेत गेल्या असता तिथे हा केंगार त्यांना भेटला व त्याने पेन्शन मिळवून देतो असे खोटे सांगून चार हजार शंभर व एकवीस हजार आठशे रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले घेतली होती.याबाबत फेब्रुवारीच्या 6 तारखेला गुन्हा नोंद झाला होता.त्यानुसार पोलिसांनी त्यादिशेने तपास करून केंगार याला अटक केली.