भन्नाट न्यूज नेटवर्क दि 11
लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून मारहाण करणाऱ्या तरुणावर आज शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.प्रशांत भास्कर कांबळे(वय 33 रा. पाडळी ता.करवीर) असे संशयिताचे नाव आहे.एका चाळीस वर्षीय महिलेशी त्याने लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार पीडित महिला व कांबळे यांची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली.त्यातून त्याने तिला लग्न करतो असे सांगून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर पीडितेने त्याला लग्नाचा तगादा लावला मात्र तो नकार देऊ लागला.माझ्या घरात आधीच भांडणे चालू आहेत आणि आत्ताच लग्नाचे काय लागलेय, असे बोलू लागला.तसेच पीडितेला मारहाण करून मला तुझ्याशी लग्न करायचे नाही तुला काय करायचे ते कर असे बोलून शिवीगाळ व धमकी देऊ लागला म्हणून पीडितेने याबाबत पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.