भन्नाट न्यूज नेटवर्क दि 11
बिंदू चौक सब जेल जवळ पाण्याच्या टँकर खाली सापडून रेखा शहा यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मुलगा मेहुलकुमार अभिनंदन शहा (वय 24 रा. कसबा गेट,महाद्वार रोड) याच्यावर गुन्हा दाखल झाला.रविवारी दि 5 रोजी हा अपघात घडला होता.
मेहुलकुमार हा त्याची आई रेखा यांना दुचाकी वरून करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक या दिशेने निघाला होता.पुढे असणाऱ्या पाण्याच्या टँकरला चुकीच्या आणि धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करताना त्याचा दुचाकी वरील ताबा सुटल्याने रेखा शहा या खाली कोसळल्या आणि त्या टँकर खाली सापडून जागीच मृत्युमुखी पडल्या