भन्नाट न्यूज नेटवर्क दि 23
राज्यासह देश विदेशात व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वी साठी सर्वजण समन्वयाने काम करू – जिल्हा पोलीस प्रमुख *शैलेश बलकवडे यांचे आढावा भेटीत अभिवचन कोल्हापूर – फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे आणि त्यासाठी सर्व शासकीय कार्यालये – व स्थानिक संयोजन समितीत समन्वय साधून आपण अधिक गतीने आणि समन्वयाने कार्यरत राहू या ‘ असे अभिवचन पर मनोगत जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले .
आज त्यांनी आपल्या अधिकारी वर्गासमवेत हा सोहळा होणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठ परिसरात भेट देऊन हेलीपॅडसह नव्याने होत असलेले रस्ते तसेच विविध ठिकाणच्या कामाचा प्रत्यक्ष पाहणीस आढावा घेतला आणि आपल्या उपयुक्त अशा सूचनाही केल्या . यावेळी त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये सुकाणू समिती चे डॉ .संदीप पाटील , माणिक पाटील चुयेकर विक्रांत पाटील , राजीव लींग्रज , विंक्रात पाटील , राजेश डाके आदींनी सहभाग घेतला .आगामी काळात पोलीस प्रशासन यंत्रणा आणि स्थानिक संयोजक यांच्या समन्वयाची एक यंत्रणा कायमस्वरूपी उभी करण्याची सूचना यावेळी सर्वांमध्ये मान्य करण्यात आली .जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या समवेत महोत्सवा च्या विविध ठिकाणी राजशेखर आजगेकर , विनायक सबनीस, दिपिका कृष्णाजी पाटील, पोलिस अधिकारी संकेत गोसावी , जाधव सर , सत्यराज घुले , निशांत पाटील , पोलिस पाटील – संग्राम पाटील संरपंच निशांत पाटील उपसरपंच वैभव पाटील , मालोजी पाटील आदिनी माहिती देत सुरक्षा व्यवस्था – वाहतूक – भेट देणाऱ्या व्यक्ती – संस्था ची संगणीकृत नोंद – संयोजकांना ओळखपत्रे आदि विविध पैलूनी पूर्व तयारीसह माहिती चे आदान प्रदान केले .