भन्नाट न्यूज नेटवर्क
कोल्हापूर दि.29
केवळ आपल्याला कमिशन कसे मिळेल म्हणून पोलीस प्रशासन भाजी मंडईतील गोरगरीब भाजीवाले यांच्यासह सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा “त्या” वाहतूक सेनेच्या टवाळखोर जिल्हा अध्यक्षाचे आंदोलन चेष्टेचा विषय बनला आहे. पहिल्यांदा याने घोड्यावरून “आपल्या बैलांची” वरात काढून जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिले, त्यानंतर चारही पोलीस स्टेशन व डीवायएसपींना निवेदन दिले, करवीर पी आय यांच्याबरोबर याचा वाद ही झाला. त्यानंतर त्याने जिल्हाप्रमुख, पालकमंत्री यांनासुद्धा निवेदन दिले.एवढे करून याच्याकडे संपूर्ण जिल्ह्यातून फक्त दोनच नावे बिन पुराव्याची हे न उलगडणारे कोडे आहे.
मग याला व यांच्या बगलबच्चांना या धंद्यात प्रवेश पाहिजे म्हणून हे नाटक सुरू आहे का?
ठिकठिकाणी निवेदन अर्ज देऊन आपली कुठेच “डाळ” शिजेना म्हणून या बहाद्दराने आता आय जी ना निवेदन देण्याचे मेसेज व्हायरल केला आहे.त्यामुळे अजून कोणाकोणाकडे हा निवेदन देतोय हे पाहण्यासाठी जनता उत्सुक असल्याचे दिसते.खात्यात तर अक्षरशः पोलीस या विषयावरून पोट धरून हसताना दिसत आहेत.त्यामुळे मटका आंदोलनाची शहरात खुमासदार चर्चा रंगल्याचे दिसत आहे.याने आता वृत्तमाध्यमांबद्दल सुद्धा बोंब मारणेस सुरुवात केलेली दिसून येत आहे.
त्यामुळे नजीकच्या काळात याच्या “दौलतनगर ची तंगी”,”राजस्थानी मॅटर”,रेल्वे तिकिटांचा चा सरदार ला घेऊन काळा बाजार” इत्यादी अनेक प्रकरणांची मालिका सुरू होते की काय? असे आता दिसू लागले आहे.हा ज्याच्या जीवावर उडया मारतो तो शाहू मिल जवळचा स्वयंघोषित दादा सावकारी करणारा गुंड आणि अरविन ख्रिश्चन कंपाउंड जवळील कुळ काढायची 25 पेटीची सुपारी घेणारा ,मारामारी करून दहशत निर्माण करणारा “गणेश” ने या कमिशन बहाददराला “बुच” मारून पुढे करुन स्वतः नामानिराळा झाला आहे.पोलीस दलातून या सर्वांच्या फायली ओपन करण्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
पक्ष पातळीवरील वरिष्ठांनी सुद्धा याची दखल घेऊन या बहाद्दराची उचलबांगडी करण्याचे संकेत दिले आहेत.नवउत्साही सुशिक्षित कार्यकर्त्याना त्याचे पद देऊन नवीन ऊर्जा देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.त्यामूळे पक्षाने आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करत जनता आणि पोलीस प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांना असेच शासन होणे गरजेचे आहे.अन्यथा अशा टवाळखोर आणि बेरोजगार नेत्यांची सर्व प्रकरणे बाहेर यायला लागली की पक्षाची लक्तरे वेशीवर टांगायला वेळ लागणार नाही.त्यामुळे पक्षाच्या खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्याना याचा फटका बसू शकतो.
अलिकडेच पक्ष प्रमुखांनी सुशिक्षित युवकांना राजकारणात येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.मग पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावर असले “अडाणी राजु” कसे काय बसवून लोकांच्या माथी मारण्याचे काम होते हे न समजणारे गूढच आहे.एकीकडे जनतेचा नगरसेवक होऊन सेवा करणारा जनतेचा सुप्रसिद्ध “राजू” कुठे आणि हा वाहतुकीचा कमिशन बाज कुप्रसिद्ध “राजू” कुठे याचे पक्षाने अवलोकन करणे गरजेचे आहे.कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.