भन्नाट न्युज नेटवर्क
ए. एस.ट्रेडर्स शेअर्स ट्रेड गुंतवणूक प्रकरण
कोल्हापूर, दि. 29 – ए.एस.ट्रेडर्स या कंपनीने कोल्हापुरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आणि जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये खळबळ उडाली.याबाबतची फिर्याद 25 नोव्हेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर शाहूपुरी दुसरी गल्ली येथील या कंपनीने आपला गाशा गुंडाळला असल्याचे दिसून आले.
या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. दरम्यान ए एस ट्रेडर्स च्या संचालक एजंट यांच्यावर कारवाई का केली जात नाही याबद्दल उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.परंतु गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि तक्रारदार यांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना तपास करण्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या.त्यामुळे सबळ माहिती आणि पुरावे गोळा करण्यात पोलिसांना वेळ लागत असल्याचे समजून येते.परंतु आता जवळपास एक महिन्याच्या कालावधी नंतर लवकरच ए एस ट्रेडर्स च्या सर्व संचालक आणि एजंट यांचे अटकसत्र लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे आता तरी गुंतवणूक धारकांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
ए एस ट्रेडर्स या कंपनीने कोल्हापुरातील सुमारे शेकडो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याच समोर आल आहे. 25 नोव्हेंबर रोजी यातील 169 जणांनी या कंपनीच्या 27 संचालकांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार सुमारे ५ कोटींची फसवणूक झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.