टि ई टी संदर्भात चौकशी करणार
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. २८ : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सदस्य संजय कुटे यांनी उपस्थित केला होता यावर उत्तर देताना श्री फडणवीस बोलत होते.