कोल्हापूर दि 17- अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलीस दिवस रात्र सेवा बजावत असतात.त्यामुळे पोलीस बांधवांना प्रचंड ताण असतो.तासनतास उभा राहून कर्तव्य पार पाडावे लागते.त्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना डिंक लाडूचे वाटप करण्यात आले.यावेळी कोल्हापूर पोलीस दलाचे पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत,पोलीस निरीक्षक के.आय.राजपूत यांच्यासह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनचे धनंजय सराटे,प्रसन्नराज दळवी,डॉ अजित यलपले तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे धीरज रूकडे,विनोद नाझरे,सागर शेरखाने आदी उपस्थित होते.