कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : केंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री.व्ही.सोमन्ना हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार,दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता बेळगाव येथून वाहनाने कोल्हापुर येथे आगमन, दुपारी 1.00 वाजता श्री करवीर निवासीनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिराचे दर्शन, सोयीनुसार भाजप कार्यालय नागळा पार्क कोल्हापूर येथे भेट, दुपारी 2.30 वाजता कोल्हापूर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे नूतनीकरणाची पाहणी, सायं. 4.00 वाजता कोल्हापूर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून माननीय पंतप्रधान यांच्या ऑनलाईन द्वारा उपस्थितीत कोल्हापूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 4.45 वाजता वाहनाने बेळगावकडे प्रयाण.