साई दर्शन जनता अर्बन निधी व साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून जनतेला कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या शुभम देशमुख च्या विरोधात सर्व संचालक व सभासदांनी एकत्रित येऊन आज मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील व समर्थ कशाळकर यांच्या नेतृत्वाखाली मा दिगंबर गायकवाड पोलीस निरीक्षक गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे यांना सर्व संचालक व सभासदांनी आज गुन्हा दाखल करणे संदर्भी तक्रार अर्ज दाखल केले. आज रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये एकूण 378 तक्रारदारांनी गुन्हे दाखल केले.
मोलमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांची कागदपत्रे कर्जासाठी म्हणून घेऊन त्यांची नावे संचालक म्हणून घातल्याचे दस्तुरखुद्द त्यांनाही माहित नव्हते. मात्र हे प्रकरण झाल्यानंतर त्या सर्व संचालकांना समजले की आमची नावे देखील संचालक म्हणून घातलेली आहेत.अशा पद्धतीने कर्जाला दिलेल्या कागदपत्रांचा संचालक पदासाठी वापर करून व त्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून त्यावर सभासदांच्या माघारी व्यवहार करून जाणीवपूर्वक कट रचून संचालकांना फसवणूक केल्याबद्दल शुभम देशमुख विरुद्ध कठोर गुन्हा दाखल करण्यासाठी संचालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली होती व त्यांच्या आदेशानुसार आज गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये संचालकांची फसवणूक करून कागदपत्रे घेतल्याबद्दल शुभम देशमुख विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करणेत आला.
याप्रसंगी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी शुभम देशमुख च्या फसवणुकीचा सखोल तपास करून दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये शुभम देशमुख ला अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अभिवचन दिले तसेच अन्य तक्रारदारांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे त्यांना देखील न्याय देण्याची त्यांनी अभिवचन दिले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर, संचालक सौ. सुरेखा पाटील,आनंदा माने, जॉकी माने, सुनिता खाबडे, नसीर बारगीर, विकास सावंत, विजयसिंह पाटील, मयूर आंगोळकर, अर्जुन पाटील, डॉ. भिकाजी साळे व मनसे पदाधिकारी अरविंद कांबळे, संजय चौगले , प्रशांत माळी, यतिन होरणे, बाजीराव दिंडॉर्ले, सागर साळोखे, आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते