कोल्हापूर दिनांक 11-कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना हत्यारे, शस्त्रे बाळगणारे लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी आपले शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, वैभव पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे पथक नियुक्त करून त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथक गोपनीय माहिती घेत असताना पथकातील वैभव पाटील यांना बातमी मिळाली की, उचगाव येथे राहणारा इसम नामे रोहन पाटील याचेकडे 01 पिस्टल व 01 रिव्हॉल्वर असून तो आज रोजी माळीवाडा, उचगाव येथे कोणालातरी विक्री करणेसाठी येणार आहे. अशी बातमी मिळाली असता नमुद पथकाने माळीवाडा उचगाव येथे सापळा लावला असता इसम नामे रोहन रुपेश पाटील, वय 20 वर्षे, रा. विठलाई कॉलनी, मणेरमळा, उचगाव, ता. करवीर हा मिळून ‘आला. त्याचे कब्जात 01 पिस्टल, 01 रिवॉल्वर व 02 जिवंत राऊंड असा एकूण 1,01,000/- रूपये किंमतीच्या वस्तु मिळून आल्या त्या कायदेशिर प्रक्रीया करून हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर इसमाविरुध्द गांधीनगर पोलीस ठाणेस आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तु कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केली आहे.