मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
मा.पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार बालाजी पाटील व सतिश जंगम यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल विकण्यासाठी दिंडनेर्ली फाटा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे दि. 04/09/2024 रोजी येणार आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 04/09/2021 रोजी सापळा लावून आरोपी नामे आरोपी नामे 1 ) ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील व व.25, रा. राधानगरी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, 2) अक्षय चंद्रकांत पाटील व. व. 29, रा. शिरगांव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यांना नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदरचा गुन्हा त्यांनी व त्यांचा साथीदार सुहास नामदेव चव्हाण रा. राधानगरी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यांनी मिळुन केलेचे तसेच सदर बाबत गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 236/2024, भारतीय न्याय संहीता कलम 303 ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. सदर आरोपीत यांचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण 05 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील व गुन्हा करण्यासाठी वापरलेली अशा एकूण 1,30,000/- रुपये किंमतीच्या 06 मोटर सायकली हस्तगत केल्या असून आरोपीकडून उघडकीस आले गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे-
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे, तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील, सतिश जंगम, वसंत पिंगळे, अमित मर्दाने, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे यांनी केली आहे.