कोल्हापूर दिनांक 3 -लोकसभेच्या मैदानात बंडखोर राष्ट्रवादीचा सुपडा साफ करण्याबरोबरच महायुतीला चारी मुंड्या चीत करून शरद पवारांनी आपलं मोठेपण सिद्ध करण्याबरोबरच अभी तो ये सुरुवात है आगे आगे देखो होता है क्या❗ असं म्हणत विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोर गद्दार राष्ट्रवादीचा उरला सुरला माज उतरवला जाईल आणि महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी व त्याची शाहू नगरीतून सुरुवात करण्यासाठी पाच दिवसाच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा योद्धा प्रचंड आत्मविश्वासाने कोल्हापुरात दाखल.
शरदचंद्रजी पवार यांचे सकाळी 12:20 मिनिटांनी शाहूनगरीच्या भूमीत आगमन झाले* साहेबांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता, दौऱ्याची सुरुवात झाली आहे पत्रकारांना अगदी इशाऱ्या इशाऱ्यानीच सर्व काही सांगितल्या सारखे करत बेळगावला साहेब निघून गेले ते आम्हा कार्यकर्त्यांना स्फूर्ती देऊनच.
3 सप्टेंबर 2024 रोजी पहिल्या गद्दाराचे तीन तेरा वाजवण्यासाठी त्याच्याच आखाड्यात जाऊन त्याला त्याची जागा दाखवली जाईल, त्यासाठी सायंकाळी 6:00 वाजता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे कागलच्या गैबीचौकात आगमन होत आहे *ज्यांना तीस वर्षे सांभाळून 18 वर्षे मंत्रीपद दिले, त्यांनीच पाटीत खंजीर खुपसला त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार हे निश्चित.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभेच्या तोंडावर देशातल्या विरोधकांना एकत्रित करत इंडिया आघाडी स्थापना केली आणि एक आत्मविश्वास विरोधकांच्या मनामध्ये निर्माण केला आणि बघता बघता सत्ताधारी लोकांना घाम फोडला,
महाराष्ट्राची विधानसभा ही सर्वात महत्त्वाची आहे महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याला नख लावण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. दोन मराठ्यांचे पक्ष फोडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गळा घोटला आहे.याचा प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये आहे तो राग लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने दाखवून दिला आहे.
लोकसभा निवडणूक हे तर ट्रेलर होते पण विधानसभा निवडणूक हे पिक्चर असेल अशी लोकभावना आहे आणि या पिक्चरचा हिरो अर्थातच संघर्ष योद्धा शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेकडे लागले आहे. सत्ताधारी जनतेला वेगवेगळी अमिष दाखवत आहेत.परंतु महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवायचाच अशी खुणगाट बांधली आहे त्याची सुरुवात कागल येथून होईल.
2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही सूर्याजी पिसाळ विरुद्ध मावळे अशीच असेल* जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जनता *छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदे मानून गद्दार आणि गद्दाराच्या सरदारांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.*
*अनिल घाटगे*