कोल्हापूर दिनांक 28 -आज कोल्हापूर असो किंवा, कोलकत्ता, बदलापूर अशा अनेक राज्यात म्हणा किंवा देशात महिला, अल्पवयिन मूलींवर राजरोसपणे अत्याचार, बलात्कार करून खून करणे, अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. रत्नागिरीत परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली आणि शहर हादरले. परगावाहून आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून कचऱ्यात फेकले.नराधम, वासनांध गून्हेगार फक्त जेलमध्ये पोसले जात आहेत, कायदा कडक होत नाही किंवा शिक्षाही अशी होत नाही की, वचक बसावा अशा कृत्यांना.
त्या अनुषंगाने आज कोल्हापूरातील विविध सामाजिक संस्था, फौंडेशन जे महिलांसाठी कार्यरत आहेत, अशा सर्व भगिनीनी मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर एल्गार केला.तसेच लवकरात लवकर कायद्यात दूरूस्ती करून अशा गुन्ह्याला मृत्यूदंडाची तरतूद करावी, तसेच असे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा द्यावी. शाळा, कॉलेज तसेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिला सूरक्षा कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न व्हावे, याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी शुभांगी साखरे,उज्वला पटेल, अलीशा भानुशाली,सोनाली रजपूत,गीतांजली डोंबे,मंगला काळे,जयश्री पाटील, बीना देशमुख ,सरिता सासने,स्मिता खामकर,पूजा पाटील,अनिता काळे,निकिता माने आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.