कोल्हापूर दि 24 – सन २०२४ या वर्षातील श्री. गणेशोत्सव सोहळयास दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी पासून सुरवात होत असून श्री. गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना दि. ०७ सप्टेंबर रोजीच करावी अन्यथा सदर मंडळावर प्रशासनाचे वतीने कारवाई करण्यात येईल अशाप्रकारचा संभ्रम अथवा गैरसमज निर्माण झाल्याबाबत विविध गणेश मंडळांनी याबाबत प्रशासनाकडे प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे विचारणा केली होती.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री. गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करावी. सदर प्रतिष्ठापनापुर्वी मिरवणूक काढत असल्यास त्याची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात यावी. जेणेकरुन सार्वजनिक मंडळांना तसेच प्रशासनास वाहतूक व बंदोबस्ताचे नियोजन करणे सुलभ होईल असे
जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.त्यामुळे सार्वजनिक मंडळांचा संभ्रम दूर झाला आहे.