78 वां स्वतंत्र दिन सचिन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्साहाने सौ व श्री सचिन पाटील यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला गेली आठ वर्ष हा उपक्रम या हॉस्पिटलमध्ये साजरा होत आहे कोल्हापुरातील हे एकमेव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे या ठिकाणी राष्ट्रीय सण अतिशय उत्साहाने साजरे केले जातात यामध्ये हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, सर्व स्टाफ, पेशंटचे नातेवाईक, अतिशय उत्साहाने सहभागी होतात
मला आज हॉस्पिटलच्या या स्तुत्य उपक्रमात हजर राहण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो खऱ्या अर्थाने देशभक्तीचा हा आगळावेगळा उपक्रम मनाला एका वेगळ्याच विचारात घेऊन गेला डॉक्टर विकास बामणे यांनी हॉस्पिटलच्या सर्व घटनांचा आढावा घेत असताना पेशंट बरा होऊन जात असताना त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य आपण पाहतो त्याचे समाधान हे खूप वेगळं आहे मोफत एन्जोप्लास्टी मोफत आरोग्य तपासणी हा आपला उपक्रम गरिबांना जीवदान देऊन जातो असे सांगितले यावेळी मुख्य डॉक्टर सचिन पाटील यांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आरोग्य सेवा बजावत असताना प्रत्येक रुग्ण या हॉस्पिटलमधून चेहऱ्यावर आनंद घेऊन गेला पाहिजे अशा भावना व्यक्त केले व सर्वांना स्वतंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो असे सांगितले. यावेळी डॉ. सचिन कुंभार डॉ. कांबळे सौ सचिन पाटील हे देखील उपस्थित होते
या च्या निमित्ताने माझ्या असं लक्षात आलं की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही त्याचे कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवते._असं काहीच सचिन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बाबत मला वाटले कारण येणाऱ्या रुग्णाला आरोग्याच्या सोयी देण्यात बरोबर आरोग्याचे कॅम्प घेऊन लोकांच्या मनामध्ये आरोग्य विषयी जनजागृती करणे राष्ट्रीय सण साजरे करून लोकांच्या मनामध्ये देश प्रेम निर्माण करणे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे डॉक्टर पासून ते शेवटच्या फरशी स्वच्छ करणाऱ्या आयापर्यंत आपण सर्वजण एक आहोत हा संदेश देण्यामध्ये सचिन सुपरस्पेशालिटी अग्रेसर आहे असे वाटते
अनिल घाटगे
B com DLL M Com LLB
राजकीय विश्लेषक व अभ्यासक