कोल्हापूर दिनांक 1 -” आयुष्यमान म्युझिक ॲकॅडमी ” चे वतीने स्व. गायक महंमद रफीं च्या 44 व्या स्मृती दिनानिमित्त, महंमद रफी यांना आदरांजली वाहण्यात आली. पनाली मल्टीपर्पज हॉल रंकाळा, येथे हा कार्यक्रम झाला, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती आयुबभाई जमादार व मानसोपचार तज्ञ डॉ. पी. एम. चौगुले, व अरुण आवटे काका यांचे हस्ते रफीं च्या प्रतिमेला हार अर्पण व प्रतिमा पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरवातीला चंद्रकांत खोंद्रे व प्रसन्न वरखेडकर, यांनी रफीं च्या सांगीतिक, गायन प्रवासाबद्दल माहीती दिली. उपस्थित सर्व रफीं चे चाहते राजेंद्र मंडलिक, दिलीप माने, डॉ. अमन पठाण यांनी रफींची अनेक गीते सादर केली, कार्यक्रमास सलीम शेख, निसार शेख, ॲड. अशोकराव साळोखे,भन्नाट न्यूज चे संपादक धिरज रुकडे, निशिकांत कवाळे, सिराजभाई शेख, , पद्मा राजे महिला मंडळाच्या अध्यक्षा, सरीता सासने व सर्व सदस्या व भरपुर रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला