कोल्हापूर दि 30:आज महाराष्ट्रामधे पाऊस कमी प्रमाणात पडला असल्यामुळे पाणी टंचाईचे सावट असताना सुद्धा कोल्हापूर मध्ये मात्र कोल्हापूर महपालिकेच्या शिंगणाूर येथील मोहिते गॅरेज जवळ पाणी पुरवठा पाइपलाइनला गळती लागून गेली सहा महिने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.कोल्हापूर महपालिकेच्या वतीने या पाइपलाइन ची गळती काढण्याचा प्रयत्न केला पण कर्मचाऱ्यांना पाईप लाईन सापडत नाही तेथील असणाऱ्या दत्त कॉलनीतील नाल्यातून हे पाणी गेली सहा महिने वाहत आहे यावेळी तेथील नागरिकांन कडून याबाबत जाणून घेतले असता त्यांनी पाणी पुरवठा अधिकारी यांना वारोवार सांगून ही अधिकाऱ्यानी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याला जबाबदार कोण अशी चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे.तरी कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी यांना विनंती आहे की सदर वरील कामात स्वता लक्ष घालून पाइपलाइनला लागलेली गळती बंद करावी ही विनंती.