कोल्हापूर दि 22- संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संकलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, धरणगुत्ती. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून कारवाई.आरोपी नं 1 अजित सूर्यवंशी-अध्यक्ष
2 महावीर अप्पासो पाटील – मुख्याध्यापक
3 अजित टकले-शिपाई या तिघांच्या वर कारवाई करण्यात आली आहे.फिर्यादी यांच्याकडे आरोपी नं.01 यांनी संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या (95,577 रुपये) इतक्या वेतन रकमेची लाच स्वरूपात मागणी करून ती लाच रक्कम दोन हप्त्यात देणेबाबत सांगून आणि तक्रारदाराने ती रक्कम न दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ रोखण्याची भीती देवून सदरची लाच रक्कम संस्थेचे मुख्याध्यापक आरोपी क्रमांक 02 यांच्याकडे देणेस सांगितले असता मुख्याध्यापक यांनी सदरची रक्कम सदरहू शाळेतील शिपाई यांच्याकडे देण्यास सांगून त्यांनी ती स्वीकारली असता त्याना रंगेहात पकडुन वरील तीनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
▶️ सापळा पथक :- श्री सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक. ला.प्र.वि.कोल्हापूर,पो उप नि. बम्बर्गेकर,
सपोफो प्रकाश भंडारे.
हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने,पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई ,रुपेश माने ,संदीप पवार,पोना/सचिन पाटील,
मपोकॉ/पुनम पाटील, चालक हेड कॉन्स्टेबल गुरव आणि हेड कॉन्स्टेबल अपराध.