कोल्हापूर दिनांक 22 :कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्याची आपण ऐकलेले होते परंतु काही महा भागांनी चोरी करण्यासाठी सुद्धा मुहूर्त काढण्याची पद्धत आता चालू केली आहे एप्रिल महिन्यामध्ये बारामती येथील देवकाते नगरमध्ये एका दरोडया मध्ये जवळपास एक कोटी रुपयांची रोख रक्कम व इतर ऐवज अशा प्रकारची चोरी झालेली होती एप्रिल महिन्यानंतर आज त्या चोरीचा उलगडा लागला आणि या उलगड्यात ही माहिती समोर आली आहे चोरांनी सदर चोरी करण्यासाठी त्यांचा ज्योतिष आहे. त्या ज्योतिषाकडून सदर चोरीचा मुहूर्त काढल्याचे सांगण्यात येते. सदर चोरांच्या कडून आज मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये 76 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली आहे