कोल्हापुर दि 22:रस्त्याच्या कामात सुमारे 200 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत आज मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक चाल करून निवेदन दिले.सदर भ्रष्टाचार च्या पुरव्यनिशी देण्यात येणाऱ्या निवेदनासाठी अभियंता एस आर पाटील यांना सुचनापत्र देऊनही हजर न राहिल्याने मनसे चे कार्यकर्ते संतप्त झाले होते.तरीसुद्धा संयम बाळगत मनसेने सदरचे निवेदन उपस्थित अधिकारी यांना दिले.परंतु पूर्वसूचना देऊनही अधिकारी गायब होण्याचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.मनसे कडे सबळ पुरावे असल्याने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता येणार नाहीत म्हणून सदर अभियंत्याने पळ काढल्याचे बोलले जात आहे.सदरचा भ्रष्टाचार प्रकरणी मनसेने अभ्यासपूर्वक आंदोलन केले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेतून मनसे चे कौतुक होत आहे.अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मनसे काय धडा शिकविते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतु आजच्या आंदोलनात सध्या तरी मनसे चे पारडे जड असल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी बोलून दाखविले.यावेळी जिल्हा सचिव प्रसाद पाटील,शहर प्रमुख राजू दिंडोर्ले यांनी याचे नेतृत्व केले.यावेळी शहर सचिव निलेश आजगावकर , अरविंद कांबळे , उत्तम वंदुरे , प्रसाद साळोखे,पुनम केसरकर , ऋतुजा दुधाने , नम्रता गौड, आदिती कोरे, सुनील तुपे , दिलीप पाटील, सागर साळोखे, यतीन होरणे आदी उपस्थित होते.