कोल्हापूर दिनांक 21: ऑगस्ट अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पोतदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सहकार्याने चेस असोसिएशन कोल्हापूरने महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धा समितीच्या अध्यक्षा व पोतदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा कपूर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले व मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली 25 ते 27 ऑगस्ट 2023 च्या दरम्यान तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार मुला मुलींच्या स्वतंत्र गटात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साधारण 150 बुद्धिबळपटू सहभागी होतील असा अंदाज आहे. एक जानेवारी 2016 किंवा त्यानंतर जन्मलेली महाराष्ट्रातील मुले मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. दोन्ही गटातून पहिल्या 10 क्रमांकांना एकूण 20000 रुपयांची रोख बक्षिसे व चषक दिले जाणार आहेत. मुलांच्या गटातून दोन मुलांची व मुलींच्या गटातून दोन मुलींची निवड सात वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात करण्यात येणार आहे. सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धा कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना आठशे रुपये प्रवेश शुल्क आहे तर जिल्ह्यातून निवडणूक झालेल्या खेळाडूंना पंधराशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तरी इच्छुक महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंनी आपली नावे महाराष्ट्र आपली नावे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे सदर पत्रकार परिषदेला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल शिल्पा कपूर व्हाईस प्रिन्सिपल मनीषा आंबराळे, जॉईंट सेक्रेटरी चेस असोसिएशन भरत चौगुले, मनीष मारूलकर ,आरबीटर आरती मोदी, पूर्वा कोडोलीकर धीरज वैद्य,प्रीतम घोडके, उत्कर्ष लोमटे व इतर सहकारी उपस्थित होते