कोल्हापूर दि.20 : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला आहे. शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर सन २००७ मध्ये कसबा बावडा वासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी “शिवनेरी” या शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले. आजतागायत या कार्यालयातून नागरिकांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. आगामी काळातही शिवनेरी विभागीय कार्यालयातून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिवनेरी या कसबा बावडा शिवसेना विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचा उद्घाटन सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो” अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सन २००५ मधील शिवसेनेतील फुटी नंतर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी घेतली. राज्यातील तत्कालीन कॉंग्रेस – राष्ट्रवादी सरकारचा सामना करीत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे आदेश वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी दिले. यासह शिवसेना पक्षबांधणीचीही मोठी जबाबदारी होती. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी हक्काचे ठिकाण असाव म्हणून शहर कार्यालयासह नागरिकांची गैरसोय टळावी म्हणून विभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. शहरात आज शिवसेनेची विभागीय कार्यालये आहेत आणि यामाध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम आजतागायत सुरु आहे. याची सुरवात सन २००७ साली शिवनेरी या कसबा बावडा येथील विभागीय कार्यालयाद्वारे करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन शिवसेना संपर्कप्रमुख आमदार श्री.सदाभाऊ सरवणकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या परिस्थितीत कसबा बावडा वासीयांच्या प्रत्येक प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन करून कसबा बावडा वासियांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेच. यासह आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर याद्वारे सामाजिक कार्याचा वसाही जपला. यामध्ये कै.काका खाडे, कै.धनंजय मोहिते, कै.विद्यानंद थोरवत, कै.सचिन रोकडे अशा शिवसैनिकांचे योगदानही मौल्यवान होते. आगामी काळात “शिवनेरी” तून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, रोहन उलपे, धवल मोहिते, सुरज सुतार, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, कपिल पोवार, सचिन पाटील, राकेश चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी, कसबा बावडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.