कोल्हापूर दि 19:महाराष्ट्र शासनाच्या कै शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांची सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.त्यानंतर प्रथमच राजा माने हे कोल्हापुर ला आले असता त्यांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या काळात पत्रकारांना घरे मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवुन त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.संघटनेच्या वाटचालीवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ,जिल्हाध्यक्ष सुहास पाटील,शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर,युवा पत्रकार संघटनेचे शिवाजी शिंगे,तसेच इतर पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.