कोल्हापूर दि 13
हिंदू एकता आंदोलन च्या वतीने जुना बुधवार पेठ येथील अभिषेक लॉन येथे धर्मसैनिक मेळावा उत्साहात पार पडला.सदर मेळाव्याला शहर तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.सदर मेळाव्यात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले,भाजपचे सत्यजीत कदम,शिवसेना शिंदे गट जिल्हा अध्यक्ष उदय उर्फ बाबा भोसले, हिंदू एकता जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई,शहर अध्यक्ष गजानन तोडकर,संदीप घाटगे,भाजप पन्हाळाचे अमरसिंह भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.