हुतात्मा पार्क उद्यानास मंजूर निधीतून सुरु असलेल्या कामाची पाहणी
कोल्हापूर दि.१३ : वर्षभर शहरात पर्यटकांची नांदी आहे. पर्यटन वाढीसह स्थानिक नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहरातील उद्याने विकसित होणे गरजेचे आहे. सुशोभीकरणासह स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उद्यानांचा विकास झाल्यास त्याचा लाभ शहरवासियांनाच होणार आहे. आपल्या माध्यमातून शहरातील विविध उद्याने, ओपन स्पेसमध्ये नागरिकांसाठी ओपन जिम ही संकल्पना राबविण्यात आली. याची दखल राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घेतली गेली. यासह स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनीही या ओपन जिममुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत सविस्तर वृत्त लेखन केले आहे. शहरातील महिलांना याचा खासकरून लाभ होत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक उद्यानात खास महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम साकारू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य शासनाकडून मंजूर निधीतून हुतात्मा पार्क येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.
सुरवातीस हुतात्मा पार्क येथे सुरु असलेल्या हुतात्मा स्मारक, वॉकिंग ट्रॅक आदी कामांचा आढावा घेतला. यासह या उद्यानास संरक्षक भिंतीसह इतर मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याकामी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी लोकांना फिरण्यासाठी असणाऱ्या जागेत विकास कामाचे साहित्य असल्याचे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर संबधित ठेकेदारास तात्काळ नागरिकांना फिरण्यासाठीचा मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना दिल्या. यासह तात्काळ महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम उभारण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण करून घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम ची संकल्पना यापूर्वी महावीर गार्डन मध्ये राबविण्यात आली. यासह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिमची विविध भागातील महिलांकडून मागणी होत असून, येणाऱ्या काळात शहरातील सर्वच उद्यानात महिलांसाठी स्वतंत्र ओपन जिम साकारू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, शिवसेना महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उपशहरप्रमुख अश्विन शेळके, रणजीत मंडलिक, नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, आकाश सांगावकर, सागर सोनटक्के आदी महानगरपालिका अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मा.संपादकसो,
दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही विनंती.
कळावे,
आपला,
नंदू सुतार, कार्यालय प्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.