महापालिका प्रशासनास सूचना : प्रशासनाची आढावा बैठक
दिनाक ०७ ; कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्कचे काम त्वरित पूर्ण करावेत, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिका प्रशासनाला दिल्या.
आमदार जाधव यांनी आज संपर्क संपर्क कार्यालयात महापालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता प्रभाकर गायकवाड, दास कंपनीचे संतोष बडवे, तुषार दांडगे उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाल्या, पावसाने काही प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे त्वरित हाती घ्या. गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण करून शहर चकाचक करा. रस्त्याच्या दुरावस्थेचा नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता प्रशासनाने घेतलीच पाहिजे.
अमृत एक व दोन योजनेतील कामे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुराव करीत आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर, ती वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रशासन व ठेकेदारांचे आहे. काम वेळत पूर्ण होत नाहीत आणि नागरिकांना त्रास झाल्यानंतर लोकप्रतिनीधीना जबाबदार जाते. त्यामुळे यापुढे प्रशासनाने आणि ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात आमदारांच्या अधिकाराचा वापर करावा लागेल असा इशारा आमदार जाधव यांनी यावेळी दिला.
पाण्याचा खजिना ते नंगीवली चौक या मार्गावरील पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे. या कामानंतर रस्ता करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना, त्यांनी तो रस्ता का केली नाही असा सवाल आमदार जाधव यांनी उपस्थित केला. या कामाबाबत ठेकेदारांना नोटीस काढल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिली. तर ठेकेदाराने या रस्त्याच्या काम आज दुपारपासूनच सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले.