कृष्णाच्या बाललीलांनी भक्तगण तल्लीन
लक्ष्मी नारायण मंदिरात भागवत सप्ताह
कोल्हापूर, ता. ४ – भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे निरूपण आपल्या ओघवत्या आणि सुश्राव्य ललित करणाऱ्या मयूर कुलकर्णी यांच्या कथेत भक्तगण आज तल्लीन झालेव्हीनस कॉर्नर येथील लक्ष्नी नारायण मंदिरामध्ये सुरू असलेल्या भागवत कथेमध्ये चौथे पुष्प वाहताना श्री. कुलकर्णी बोलत होते. कृष्णाच्या बाललीला यावर बोलताना ते म्हणाले, कृष्णाच्या बाललीलांनी सर्वत्र आनंद उधळण्याचे कार्य केले आहे. प्रत्येक लीलेतून भगवंताने अनेक उत्तम सिद्धांत भक्तांसमोर मांडले आहेत.कृष्णाच्या बाललीला नवनीत चोर रूप, भगवंताने केलेला गोवर्धन उद्धार, पुतना उद्धार याचे निरूपण झाले. भगवान कृष्णच सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आहेत आणि तेच अनेक देवतांच्या रूपात प्रगट होऊन भक्तांच्या कामना पूर्ण करतात, असा आशावादही श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.यानंतर भगवंताच्या बाललीलांचे स्मरण आणि अनुभव घेण्यासाठी मंदिराच्या वतीने दहीहंडीचा कार्यक्रम झाला. भक्तिगीतांवर नृत्यविष्कारही झाला. त्यामुळे मंदिरात चैत्यनाचे वातावरण होते. संपूर्ण कार्यक्रमात महिलावर्गात प्रचंड, जोश, उत्साह पाहावयास मिळाला.
आजचे कार्यक्रम – दुपारी ३.३० कथा, कृष्ण विवाह
सायंकाळी ७.३० आरती