कोल्हापूर दि 4:कोल्हापूर शहरातील काही कॉलेजच्या परिसरात कॅफे आहेत. या कॅफेमधील अंधाऱ्या खोलीमध्ये निर्भया पथकाने छापा टाकून अश्लील चाळे करणाऱ्या वर कारवाई केली.
कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅफेंची संख्या आहे. काही कॅफेमध्ये कॅफेपेक्षा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीमुळे पोलिसांनी छापेमारी केली असता, त्या कॅफेत अंधाऱ्या खोलीत काही जोडपी अश्लील चाळे करताना आढळून आली. यामुळे पोलिसांनी कॅफेसह या जोडप्यावर कारवाई केल्या आहेत.तसेच यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे, ही कारवाई यापुढेही कायम राहील असे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.