दिनाक ०३ ; शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .दरम्यान सकाळी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.प्रा. डॉ. केशव हरेल यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. हरेल म्हणाले, शेकाप हा तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवणारा पक्ष असून जनतेच्या पाठबळावर पुन्हा सत्तेत येईल. यावेळी बाबुराव कदम यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते व महिलांचा सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.पी. माळी होते. या कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.