दिनांक२३: Maharashtra School Exam: आता, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असे. मात्र, पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते.राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.वर्ष 2009 मध्ये लागू झालेल्या मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार, शाळांना आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, यामुळे आठवी पुढील शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात होता. त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याची मागणी होऊ लागली होती
.2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा 6 ते 14 वयोगटातील 80 लाख मुलं शालेय शिक्षणापासून वंचित होते.