कोल्हापूर: जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीवरील खर्डेकरांची पेरुची बाग सध्या कोल्हापूर महानगरपालिकेचे ताब्यात असलेले रि.स.नं. १/१ब (सि.स.नं.२३२८) असलेली जागा याठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेने ७ ते ८ महिन्यांपूर्वी कंपौंड घालून जागेचा ताबा घेतला. आणि त्याठिकाणी सपाटीकरण केले. तसेच महानगरपालिकेचा ताबा असलेला फलक देखील याठिकाणी लावलेला आहे. हे सर्व करत असतांना याठिकाणी मोठे पादुका असलेले व महादेवाची पींड असलेले मंदीर याठिकाणी होते, हे मंदिर अचानक येथून गायब झालेले आहे. याबाबत आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला असता महानगरपालिकेने आम्हास याबाबत कुठलीही माहिती नाही असे उत्तर दिले आहे. या ६ महिन्यांमध्ये हे मंदिर कुणी गायब केले अथवा कुणी पाडले, तेथील मंदिराचा अवशेषही त्याठिकाणी ठेवलेला नाही. याप्रकरणी आपण रितसर चौकशी करावी व पुरातत्व विभागालाही आपल्यामार्फत पत्र देवून या मंदिराबाबत चौकशी करावी तसेच असंख्य हिंदु लोकांच्या भावना याबाबत दुखावल्या आहेत या गोष्टीचा मोठा उपद्रव होण्यापेक्षा वेळीच आपण लक्ष घालावे, कारण पुरातन मंदिरे अशा पध्दतीने जर गायब होत असतील तर कोल्हापूरातील इतिहासाचे महत्व या पध्दतीने कमी होत जाईल. तरी सदर प्रकरणाची आपण रितसर चौकशी करावी ही विनंती केली.त्यावेळी अनिल पाटील, शशिकांत हळदकर, रणजित शिंदे ,विराज पाटील, गोविंद वाघमारे, इम्रान नुराणी ,धीरज रुकडे , माँरिस भालेराव, विजय नाईक आदी उपस्थित होते.