भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयामध्ये
बोलावून, मागासवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. हे विद्यार्थी ही माहिती
समाजातील तळागाळातील गरजू पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम "माहिती दूत" म्हणून करतील. इथून
पुढे दर सोमवार ते शुक्रवार दररोज एका महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयामध्ये
बोलावून कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक
आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांची
माहिती देऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रबोधित केल्याबद्दल महावीर महाविद्यालयाचे
प्राध्यापक शरद गायकवाड यांनी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आजच सुरुवात करण्यात आलेल्या उपक्रमांत महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील विद्यार्थी सहभागी
झाले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने
राबविण्यात येणऱ्या विविध कल्याणकारी योजनांची पीपीटी मार्फत या कार्यालयाचे तालुका समन्वयक सुरेखा
डवर, सचिन परब व सचिन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी प्रा. श्वेता परुळेकर, प्रा.अंकुश गोंडगे, प्रा.शैलेंद्र सडोलीकर, समान संधी केंद्र प्रमुख, महावीर
महाविद्यालय कोल्हापूर उपस्थित होते.