भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 3 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 5 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व
राखीव. दुपारी 4.45 वाजता संभाजीनगर येथून तीन बत्ती चौककडे प्रयाण. सायं. 5 वाजता फिरत्या
रुग्णालयाच्या उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ: तीन बत्ती चौक, शहापूरकर हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर) सायं.
सोयीनुसार संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.
सोमवार, दिनांक 6 मार्च 2023 सकाळी 9.45 वाजता संभाजीनगर येथून शाहूपुरीकडे प्रयाण. सकाळी
10 वाजता टेलिमॅटिक कंपनीच्या आयोजित बैठकीस उपस्थिती. (स्थळ: शाहूपुरी, पहिली गल्ली, राऊजी
कॉम्प्लेक्स, शाहूपुरी) सकाळी 11 वाजता विद्या प्रबोधिनी स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ:
शाहूपुरी लॉ कॉलेजसमोर) सकाळी 11.45 वाजता शाहूपुरी येथून सर्किट हाऊसकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता
सर्किट हाऊस येथे आगमन व राखीव. सायं. 5 वाजता सर्किट हाऊस येथून निवासस्थानाकडे प्रयाण. सायं. 5.30
वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.
मंगळवार, दि. 7 मार्च 2023 रोजी संभाजीनगर येथील निवासस्थानी राखीव. दुपारी 1.30 वाजता
निवासस्थानाहून पुण्याकडे प्रयाण.