भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींचा निपटारा होण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे
कामकाज जलदगतीने होण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीन
व भूखंड वाटपाबाबत कार्यक्रम निश्चित केला आहे. त्या-त्या प्रकल्पातील जमीन व भूखंड मिळण्यास शिल्लक
असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणी अर्ज नमुद ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष
उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे
यांनी केले आहे.
प्रकल्पाचे नाव, उपविभागाचे नाव, अर्ज करावयाचा दिनांक व अर्ज सादर करावयाचे ठिकाण
खालीलप्रमाणे-
चांदोली प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, इचलकरंजीसाठी दि. 9 मार्च 2023 रोजी उपविभागीय
अधिकारी कार्यालय, इचलकरंजी.
धामणी प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, राधानगरी- कागलसाठी दि. 14 मार्च 2023 रोजी राई, ता.
राधानगरी.
नागनवाडी प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, राधानगरी- कागलसाठी दि. 23 मार्च 2023 रोजी तहसील
कार्यालय, भुदरगड.
आंबेओहोळ प्रकल्प- उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लजसाठी दि. 29 मार्च 2023 रोजी तहसील
कार्यालय, गडहिंग्लज.
नमुद केलेल्या दिनांकास व ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड मिळालेला नाही त्यांनी अर्ज व
त्यासोबत 65 टक्के रक्कम भरल्याचा पुरावा व बुडीत जमिनीची कागदपत्रे सादर करावीत, असेही श्रीमती सोनवणे-
जिरंगे यांनी कळविले आहे.