भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): थेट कर्ज योजने अंतर्गत आर्थिक व भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मंजूर
एकूण 213 अर्जदारांपैकी 65 लाभार्थींची निवड चिठ्ठी पध्दतीने करावयाची आहे. यासाठी पात्र अर्जदारांनी, दि.
1 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता श्री. महालक्ष्मी मंगल कार्यालय, रुईकर कॉलनीसमोर, कावळा
नाका,कोल्हापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे
(म), जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी केले आहे.
अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, लाभार्थी निवड समिती, कोल्हापूर यांचे दालनात लाभार्थी निवड समितीची
बैठक संपन्न झाली असून यामध्ये महामंडळाच्या परिपत्राकानुसार व नियमानुसार कागदपत्रांची पुर्तता केलेल्या, Cibil
Score 500 च्या वर असलेल्या, तसेच महामंडळाच्या योजनेचा यापूर्वी लाभ न घेतलेल्या अर्जदारांना पुढील
प्रक्रियेसाठी पात्र करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी दिली आहे.