भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4.35 वाजता बसर्गे येथे आगमन. दुपारी 4.35 ते 4.50
वाजता जल जीवन मिशनच्या भूमी पुजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.40 वाजता गडहिंग्लजकडे प्रयाण.
सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजता पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद. सायंकाळी 6.50 वाजता
आजराकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 ते 7.50 वाजता आजरा सुतगिरण हॉल येथे तरुण नवमतदारांशी संवाद. रात्री
9.30 वाजता कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार, दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.45 वाजता नंदवाळ येथे आगमन व प्राचीन मंदिरात
दर्शन. सकाळी 10.10 वाजता कांडगाव येथे आगमन. सकाळी 10.10 ते 11 वाजता उज्वला गॅस योजनेच्या
लाभार्थ्यांशी संवाद. सकाळी 11.05 वाजता हळदी येथे आगमन व जलजीवन मिशनचे भूमिपूजन व इतर
कार्यक्रम. सकाळी 12.10 वाजता म्हाळूंगे येथे आगमन. दुपारी 12.10 ते 1.10 वाजता पंतप्रधान आवास
योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद. दुपारी 1.20 वाजता कुरुकली येथे आगमन. दुपारी 1.20 ते 2 वाजता राखीव.
दुपारी कुरुकली येथून पुण्याकडे प्रयाण.