भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता येत्या 1 मार्चपासून प्रादेशिक
परिवहन कार्यालयात पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांकडे स्वत:चे हेल्मेट असणे आवश्यक
आहे. तसेच दुचाकीला आरसे आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार नंबर प्लेट असणे आवश्यक आहे.
त्याशिवाय चाचणी घेतली जाणार नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली
आहे.