भन्नाट न्युज नेटवर्क
पत्रकार मारहाण प्रकरण भोवणार
प्रसिद्धीच्या नादात “अदृश्य” बाबाचा इव्हेंट निष्पाप गायींच्या जीवावर बेतला...
कोल्हापूर दि. २४ -गेले काही दिवस सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या कणेरी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव मध्ये लाखो लोक येत असल्याचा बडेजाव पना करत शिळे अन्न घातल्यामुळे तब्बल 54 निष्पाप गायीचा मृत्य झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे.प्रसिद्धी साठी हपापलेल्या व्यवस्थापना ला कशाचेही भान राहिले नसून त्यांनी बातमी दाबून ठेवण्याच्या हेतूने पत्रकारांना मारहाण केली का? असा सवाल आता जनतेतून केला जात आहे.आम्ही कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करतोय या अश्या ढोंगी दिखाऊपणा मुळे मृत्यमुखी पडलेल्या गायींच्या मृत्यूला जबाबदार कोण?लाखो लोकांची जेवणाची सोय केली असल्याचे अभिमानाने मिरवणाऱ्या व्यवस्थापनाला निष्पाप मुक्या जनावरांच्या चाऱ्याची सोय करता आली नाही का? एकंदरीत कणेरी मठ काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सदर घटनेबाबत उचस्तरीय चौकशी होऊन दोषींवर गोमाता संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होणार का?असा संतप्त सवाल जनतेतून केला जात असून याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.या अश्या मोठ्या आणि मिरवण्याच्या इव्हेंटच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे कोणते रक्षण आणि भक्षण करत आहोत याचे आत्मपरीक्षण मठाने करणे गरजेचे आहे.अन्यथा एक दिवस कोल्हापूरकर यांना “अदृश्य” केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.या मग्रूर व्यवस्थापनाकडून सदरच्या बातमीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण करण्यात आली असून दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तमाम पत्रकार बांधवांची मागणी आता जोर धरू लागली आहे.याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे लवकरच समजेल.