भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी
3.50 वाजता कणेरी मठकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता सिध्दगिरी, कणेरी मठ येथे आगमन. दुपारी 4.30 ते
सायंकाळी 5.30 वाजता पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. रात्री 8 ते 10 वाजता
इम्तियाज पाटील यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ :आलास, ता. शिरोळ) रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह
येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण.
सकाळी 11 ते 12 वाजता महालक्ष्मी महोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. दुपारी 12.30 वाजता
कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1 वाजता विमानाने अहमदाबाद, गुजरातकडे प्रयाण.