कोल्हापूर दि 28- महाराष्ट्र् राज्य विद्युत वितरण नियंत्रण महा पारेषण या वीज मंडळाने सर्व ग्राहकांना विद्युत वीज बिला सोबत वाढीव अनामत रक्कम बिले पाठवली आहेत मागील वर्षी ही आशा प्रकारे वाढीव वीज बिला सोबत अनामत रक्कम घेतली होती ती ग्राहकाने भरली होती पुन्हा नव्याने अनामत रक्कम या वर्षी ही लागू केली आहे अशा अन्यायी अनामत रक्कम न भरण्याचा इशारा आज MSEB चे शहर अधीक्षक सुनील कुमार माने यांना निवेदन देण्यात आले व तसेच नवीन मीटर घेताना फिक्स डिपॉझिट ग्राहकडून कायम घेतली जाते पण प्रत्येक वर्षी आशा पद्धतीने डिपाझिट घेऊन ग्राहकांची फसवणूक MSEB करत आहे तसेच मागील डिपॉझिट वजा न करता नवीन डिपॉझिट घेत आहेत ही डिपॉझिट बिल रद्द करावे अन्यथा लाईट बिलाची ऑफिस समोर होळी करण्यात येईल व अधिकाऱयांना सळो की पळो करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशिल भांदिगरे यांनी दिला या वेळी जुना बुधवार पेठेतील नागरिक अनिल पाटील,शशिकांत जाधव,गणेश जाधव,किसन पाटिल,इम्रान नुराणी,प्रशांत खाडे, मधुकर पाटिल ,सादिक अत्तर,रणजित शिंदे आदी नागरिक उपस्थित होते