कोल्हापूर दि २७ : मानवी जीवन सुंदर बनवायचे असेल तर आपले जगणे आपल्या उपजीविकेशी जोडणे गरजेचे आहे. या दोन्हींचा समतोल जीवन समृद्ध करतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘माझी शाळा , माझा फळ’ समूह आणि संगीत व नाट्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
24 मे ते 26 मे दरम्यान या कार्यक्रमात राज्यभरातील सुमारे 300 कलाकार सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या तीन दिवसांत डिजिटल कॅलिग्राफी, कॅरेक्टर स्केचिंग, हॅपी आर्ट, आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शन इत्यादी विषयांवर सेमिनार आणि कार्यशाळा होती.
उद्घाटन समारंभात बोलताना कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, “अशा सर्जनशील कलाकारांचे विद्यापीठात अक्षर संमेलनाच्या माध्यमातून एकत्र येणे हे एक चांगले लक्षण आहे. मला आशा आहे की या संमेलनातून अनेक सकारात्मक आणि सर्जनशील मुद्दे समोर येतील आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा देतील.”