कोल्हापूर दि 21-दि.19.05.2024 रोजी 18.30 वा. चे सुमारास इसम नामे विकास आनंदा पाटील, व. व. 40, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर हा गावातील दुध डेअरीत दुध घालून मोटर सायकलवरून जनावरांचे गोठ्यात जात असताना आरोपी नामे युवराज शिवाजी गायकवाड, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर व त्याचे इतर तीन साथीदारांनी त्याला पोर्ले तर्फ ठाणे गावातील तळेकरांचे विट भट्टीजवळ आले नंतर जुने भांडणाचे कारणावरून काठ्यांनी व हत्यारानी मारहाण करून जिवे ठार मारून पळून गेले होते. त्याबाबत मयत विकास आनंदा पाटील यांची आईने पन्हाळा पोलीस ठाणे येथे दिले तक्रारीवरून गु.र.नं. 126/2024, भा.द.वि.स. क. 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड हा सैन्य दलात नोकरीस असून गुन्हा घडले नंतर त्याचे साथीदारांसह पसार झाला होता. गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करणे करीता पोर्ले गावातील नागरीक एकत्र जमा झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून नये याकरीता मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करणे बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव यांची पथके तयार करून आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले. सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडले पासून आरोपींचे ठावठिकाणा बाबत माहिती घेत असताना पथकास सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी 01 ) युवराज शिवाजी गायकवाड, व. व34, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर व 02) ओंकार संभाजी वरूटे, व. व.25, रा. आरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर हे केर्ली फाटा येथे आले असलेबाबत माहिती मिळालेने सदर पथकाने केर्ली फाटा येथे जावून सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपी नं. 03 ) सोमनाथ पंडीत वरूटे, व. व. 27, रा. आरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर व आरोपी नं.04)शरद बळवंत पाटील, व. व. 37, रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांना त्यांचे गावातून ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला म्हणून सर्व आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी पन्हाळा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. महेंद्र पंडित, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती जयश्री देसाई, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, शाहुवाडी विभाग, श्री. आप्पासो पवार, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पन्हाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश इंगळे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक, श्री. संदिप जाधव तसेच पोलीस अंमलदार शिवाजी जामदार, विजय गुरखे, संजय पडवळ, ओंकार परब, प्रशांत कांबळे, अमित मर्दाने, वसंत पिंगळे, संजय हुंबे, अमित सर्जे, सतिश जंगम, महेश खोत, विनोद कांबळे, सागर माने, रफिक आवळकर व सुशिल पाटील यांनी केलेली आहे.