कोल्हापूर दि 21-तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्री चा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडे करारवरती कागल तालुक्यात जमीन घेतली असून सदर जमीन एन ए करणेकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मुळ मालकाचे वतीने अर्ज केला होता सदर जमिनीच्या एन ए चे कामाकरिता तक्रारदार यांचेकडे आलोसे श्रीमती अश्विनी अतुल कारंडे. वय- 46 वर्षे, पद – अव्वल कारकून, तहसिल कार्यालय कागल, जि.कोल्हापूर,(वर्ग -03) रा. लक्षदीप नगर,04 नंबर बंगला, प्लॉट नंबर 339, रेल्वे स्टेशन समोर न्यू शाहुपुरी कोल्हापूर. कारंडे यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतः करीता 60,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 30,000/- रुपये लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केलेप्रमाणे आलोसे कारंडे यांनी तक्रारदार यांचेकडून 30,000/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पर्यवेक्षण अधिकारी:- श्री सरदार नाळे. (पोलीस उप अधीक्षक)
सापळा पथक :- श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक
सपोफो / श्री प्रकाश भंडारे पोहेकॉ / श्री अजय चव्हाण
पोना / सुधीर पाटील, ला.प्र.वि
कोल्हापूर.
➡मार्गदर्शन अधिकारी :-
1)मा. श्री अमोल तांबे.(पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे.
(मोबा.9922100712)
2)मा.श्री. विजय चौधरी.(अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे.
(मोबा. 9607323232)
यांनी या प्रकरणी काम पाहिले. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. (तसेच तक्रार दिल्याने आपलं कोणतेही शासकीय काम थांबत नाही.) असे आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात आले आहे.