कोल्हापूर दि १६ : गडहिंग्लज-आजरा महामार्गावरील म्हसोबा देवस्थानजवळ मंगळवारी पहाटे एका गव्याने गाडीवर उडी मारल्याने गाडीतील प्रवासी जखमी झाले.
जखमी युवराज मारुती देशमुख आणि रत्नप्रभा प्रकाश कांबळे हे दोघेही जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बुरुडे गावचे रहिवासी आहेत.
देशमुख व कांबळे हे कारमधून गडहिंग्लजकडे जात होते. कार म्हसोबा देवस्थानाजवळ आली असता बिबट्यांचा कळप रस्त्यावर आला. रस्ता ओलांडण्यासाठी धावत असलेल्या एका गव्याने वाहनावर उडी मारली. यात कारचे नुकसान होऊन देशमुख व कांबळे जखमी झाले. नजीकच्या वाहनधारकांनी घटनास्थळ गाठून जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.