कोल्हापूर दि : १३ आद्यगुरू शंकराचार्य जयंती निमित्त योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ मे ते १२ मे २०२४ या दरम्यान योगसद्गुरू हीलिंग दरबार, कोल्हापूर येथे मार्शल योगा शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये ध्यानाची मुलभूत ५ तत्व, प्राणायामामध्ये प्राणयोग, प्राण कुंभक, प्राण हृदय, प्राण शुगर, प्राण वजन , प्राण अष्टचक्र, प्राण हिलर, प्राण कर्ण, आणि ओमकार, महाबंध – मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालिंदर बंध, योग, व्यायाम आणि स्वसंरक्षणाच्या 16 अभ्यासक्रमातून 252 प्रकार, आपला डॉक्टर आपल्या हातात, मंत्रासह सूर्यनमस्कार, 32 अंकी सूर्यनमस्कार, 32 अंकी चंद्र नमस्कार आणि शिवस्वरोदय योग हा अभ्यासक्रम शिकवण्यात आला आणि सांगता समारंभाच्या वेळी ध्यान आणि योग व्यायाम आरोग्यदाता भावार्थ सहित पूर्ण करून प्रसाद वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. सदर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुढील साधकांना सह मार्शल योगा शिक्षक म्हणून प्रमाणित करण्यात आले १) ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे) २) डॉ. देवेंद्र साठे (पुणे) ३) उमा चौगुले (सातारा) ४) पल्लवी बकरे (कोल्हापूर) ५) इबारतुनिसा अन्सारी (अहमदनगर) ६) गौरी भारती (पुणे) ७) डॉ. रिद्वी काळे (राजकोट) ८) शितल संकपाळ (कोल्हापूर) ९) किरण मोहिते (चिपळूण) १०) संगीता वराडे ( बुलढाणा) ११) नम्रता गुरव (लांजा) १२) सिद्धांत जाधव (रत्नागिरी) १३) डॉ. सुनिता काळे (कोल्हापूर) सदर सह मार्शल योग शिक्षक शिबिरामध्ये सहभागी साधक पुढील प्रमाणे विजया इंगवले (मुंबई), संध्या फरागडे (सातारा), शेखर मधुरी (कर्नाटक), सुनिता कुलकर्णी (कोल्हापूर), रुपाली पिंगळे (भुसावळ), तेजस्विनी शिंदे (कोल्हापूर), संध्याताई गोसावी (कोल्हापूर), शिल्पा कांबळे (कोल्हापूर), अश्विनी बनने (कोल्हापूर), सरिता निंबाळकर (कोल्हापूर), वर्षा कणांगलेकर (कोल्हापूर), संजय पोवार (कोल्हापूर), सुनिता वाघ (अहमदनगर), सुरेखा पाटील (माउंट आबू) ऋचा लळीत (कोल्हापूर), राजाराम पाटील (कोल्हापूर), केशव अडसुळे (कोल्हापूर), नारायण लळीत (कोल्हापूर), तेजसिंह भोसले ( कोल्हापूर) मार्शल योग शिक्षक दिलीप बामणे (कोल्हापूर). मार्शल योग प्रशिक्षक महादेवराव करपे (कोल्हापूर) आणि मार्शल योग प्रशिक्षक मनीषा लळीत (कोल्हापूर), नियमित ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्शल योग वर्ग सुरू आहेत सदर योग वर्गात प्रवेश निश्चित करण्याकरिता 9821220495 या नंबर वरती संपर्क करा. सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सदरचे शिबिर हे माय अकॅडमी संचलित महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळ आणि हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले, अशी माहिती मार्शल योगशिक्षक आणि योगसद्गुरु हिलींग दरबार, कोल्हापूरचे संचालक श्री नितीन गिरी यांनी दिली.