कोल्हापूर दि: 8 #राधानगरी तालुक्यातील फेजीवडे येथे गवा संवर्धन या विषयावर आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.या मतदान केंद्राला आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली व मतदान वाढवण्याकरता आवश्यक त्या सूचना दिल्या.
तसेच राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे शिष्यवृत्ती या विषयावर तयार करण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रास ही भेट दिली.
सरवडे येथे वृद्ध मतदार यांची आस्थेने विचारपुस केली तसेच 100 वर्षाच्या वृद्ध मतदारांचे कौतुक ही केले