कोल्हापूर, दि.३०: मोरेवाडी- पाचगाव (ता करवीर) येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज मंगळवारी येथील पंचगंगा स्मशानभूमीला ४८ बेडच्या मयत व्यक्तींच्या रक्षा विसर्जन संबंधी माहितीचा सूचना फलक व पाच रक्षापात्र भेट देण्यात आले. फलक व रक्षापात्र महापालिकेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर शुभांगी पवार यांनी मंचचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांच्या कडून स्वीकारले. सूचना फलकास प्रेमानंद मौर्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मौर्य यांनी आमच्या मंचकडून दिलेली आजची भेट ही प्रातिनिधिक स्वरूपाची असून भविष्यात स्मशानभूमीस आणखीन मदतीची आवश्यकता असल्यास मंच मदत करणेचा प्रयत्न करेल. तसेच स्मशानभूमीकडील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांनाही शैक्षणिक सहकार्य करणेचा मानस आहे. आजची आमच्या मंचची छोटीशी मदत महापालिकाने स्वीकारलेबद्दल मंचच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचे प्रेमानंद मौर्य म्हणाले. शुभांगी पवार यांनी स्मशानभूमीला अनमोल भेट दिल्याबद्दल महापालिकाच्यावतीने मंचचे आभार मानले.
यावेळी कर्मचारी निलेश कांबळे, जय कांबळे, सुरज कांबळे तसेच मंचचे सुशिलकुमार कांबळे, रंगराव कांबळे, नामदेव माने, राकेशकुमार तामगांवकर, संजय गुदगे, रविंद्र घस्ते, जी के कांबळे, बाबासाहेब शिर्के, बाबासाहेब आंबेकर, संपतराव कांबळे,डी के हंकारे, नितीन कांबळे इत्यादी उपस्थित होते.