कोल्हापूर दि २७ : देशाच्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे. आपला कोल्हापूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीतही कोल्हापूर जिल्ह्याला अग्रेसर बनवूया, असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांनी केले आहे.
I LOVE KOLHAPUR
I VOTE FOR KOLHAPUR