कोल्हापूर दि 7
काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात जवळपास 30 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.यामुळे समृद्धी महामार्गाबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या.परंतु सदर बसचा चालक दानिश शेख याच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल समोर आला असून त्याच्या रक्तात 30 टक्के मद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अश्या ड्रायव्हर लोकांच्या मुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.खाजगी बस कंपन्यांना याबाबत कडक धोरण राबविण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी होत असताना दिसत आहे.